नववधूने लग्नात नक्की ट्राय करा या ट्रेंडिंग हेअर अॅक्सेसरीज
नववधूसाठी ट्रेंडिंग हेअर अॅक्सेसरीज लिस्ट
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील मोठा क्षण असतो आणि या दिवशी सगळं खास असावं असं प्रत्येकालाच वाटत असतं. यात खासकरुन नववधूसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो.
लग्नात अनेक विधी असतात. या विधींसाठी वेगवेगळा लूक ट्राय करण्यावर खासकरुन तरुणींचा भर असतो. यात मेकअपपासून ते हेअरस्टाइलपर्यंत प्रत्येक गोष्टींची काळजी घेतली जाते.
बाजारात सध्या नववधूसाठी अनेक हेअर अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत. म्हणून, नववधूचा लूक खुलवणाऱ्या हेअर अॅक्सेसरीज कोणत्या ते पाहुयात.
बाजारात सध्या सगळ्यात जास्त ट्रेंड होतंय ते म्हणजे माथापट्टी. लांबसडक केस असलेल्या तरुणींना ही माथापट्टी शोभून दिसते. विशेष म्हणजे, बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा या माथापट्टीला पसंती देत आहेत.
जर तुम्ही हेवी लहंगा घालणार असाल तर त्यावर बेसिक हेअर स्टाइल करुन डिझायनर हेअर क्लीप लावू शकता. यामुळे तुम्हाला प्रिन्सेस लूक करता येऊ शकतो.
बाजारात सध्या अनेक आकाराचे, रंगाचे आर्टिफिशिअल फ्लॉवर्स उपलब्ध आहेत. ही फूलं वापरुदेखील तुम्ही नवीन लूक क्रिएट करु शकता.
जर तुम्हाला लग्नात लूज बन किंवा आंबाडा घालायचा असेल तर त्यावर तुम्ही आर्टिफिशिअल गजरा किंवा वेणी सुद्धा ट्राय करु शकता.