अनेक मराठी कलाकार आडनावाऐवजी वडिलांचं नाव लावतात.
अमृता सुभाष अशी अभिनेत्रीची ओळख आहे. तिचं माहेरचं आडनाव अमृता ढेंबरे असं आहे. तिने संदेश कुलकर्णीसोबत लग्न केलं आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली रसिका सुनीलचं आडनाव 'धाबडगावकर' असं आहे.
लोकप्रिय अभिनेत्री सायली नावापुढे वडिलांचं नाव संजीव असं लावते. तिचं आडनाव चांदोस्कर आहे.
पृथ्वीक प्रतापला आपण महाराष्ट्राची हास्यजत्रेमुळे ओळखतो. त्याचं आडनाव कांबळे असं आहे.
तेजस्वी प्रकाश या मराठमोळ्या अभिनेत्रीने बिग बॉस १५ चं विजेतेपद पटकावलं. तेजस्वी प्रकाशचं पूर्ण खरं नाव तेजस्वी प्रकाश वायंगणकर असं आहे.
'जुळून येती रेशीमगाठी’ फेम ललित प्रभाकर याचं पूर्ण नाव ललित प्रभाकर भदाणे आहे. भदाणे हे आडनाव न लावता तो वडिलांचंच नाव लावतो.