तुलसीची भूमिका साकारून स्मृती इराणी घराघरात पोहोचल्या.
'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिकेचा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रोमोमध्ये प्रेक्षकांना तुलसीची झलकही पाहायला मिळाली.
मालिकेत तुलसीची भूमिका साकारून स्मृती इराणी घराघरात पोहोचल्या. त्या राजकारणातही सक्रिय आहेत.
पण, त्यांचा हा प्रवास अजिबातच सोपा नव्हता. तुलसी विराणी या भूमिकेने त्यांना ओळख मिळवून दिली.
कलाविश्वात येण्याआधी त्या मॅकडोनाल्डमध्ये क्लिनर म्हणून काम करायच्या. त्यांना महिन्याला १८०० रुपये पगार होता.
'क्योंकी सास भी कभी बहु थी' मालिकेने त्यांचं नशीब उजळलं. तेव्हा त्यांना एका एपिसोडसाठी १८०० रुपये मिळायचे.
तर आता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'च्या सीक्वलमध्ये एका एपिसोडसाठी त्यांना १४ लाख रुपये मिळतात.
२९ जुलैपासून 'क्योंकी सास भी कभी बहु थी २' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.