अभिनेत्री क्रिती सनॉन ही सध्याच्या घडीला बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.
क्रितीचा भारतासह जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते
क्रिती अलीकडेच तिच्या सहलीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी क्रिती ही तिचा बॉयफ्रेंड कबीर बाहियासोबत सुट्टी एन्जॉय करत असल्याचं हेरलंय.
क्रितीनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती क्रुझवर दिसतेय. तर कबीर बाहियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तोही क्रितीसारख्या क्रूझवर दिसतोय.
दोघांनीही एकमेकांना फोटोमध्ये टॅग केलं नाही किंवा एकत्र फोटो टाकलेले नाहीत. पण, परंतु दोघांचं बॅकग्राउंड बघून चाहत्यांनी क्रिती आणि कबिर एकत्रच सुट्टी घालवत असल्याचा अंदाज बांधलाय.
क्रिती आणि कबीरच्या नात्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सतत रंगत आहेत. दोघे अनेकवेळा एकत्र इव्हेंट्समध्ये दिसले आहेत.
मात्र, अद्याप त्यांनी त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा केलेली नाही.