माधुरी हत्तीणीचे वनतारामध्ये जंगी स्वागत!

कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये पाठवण्यात आले आहे.

Madhuri Elephant Kolhapur: कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीण अखेर गुजरातच्या वनतारामध्ये  दाखल झाली.

वनतारा हे पशुसंग्रहालय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाच्या मालकीचे आहे.

ही हत्तीण ताब्यात देण्यावरुन गेले दोन आठवडे कोल्हापूर आणि नांदणी परिसरात संघर्ष सुरू होता.

वनतारात पाठवण्यापूर्वीच माधुरीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. साश्रूपूर्ण वातावरणात तिला निरोप देण्यात आला.

स्वस्तिश्री पट्टाचार्य महास्वामी यांनी माधुरीची पूजा केली. यावेळी मठाचे महास्वामींसह ग्रामस्थ आणि भाविकांना अश्रू अनावर झाले होते.

आता अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर माधुरीला पोलीस बंदोबस्तात वनतारा पशुसंग्रहालयाच्या ताब्यात देण्यात आले.

वनतारामध्ये दाखल झाल्यानंतर माधुरीचे जंगी स्वागत करण्यात आले. तिच्यासाठी फुलांची सजावट करण्यात आली होती.

WELCOME म्हणून फुलांची लिहिण्यात आले होते. तसेच, माधुरीसाठी विविध फळांचा आहारही देण्यात आला. 

या स्वागताचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशळ मीडियावर व्हायरल होत आहेत.

Click Here