हिरवा निसर्ग हा भवतीने... 'आपल्या' गगनबावडा घाटाचं मनमोहक सौंदर्य

कोल्हापुरातील गगनबावडा घाटात पावसाळ्यात निसर्ग प्रेमींची मोठी गर्दी जमलेली असते. 

कणकवली ते कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडाची विहंगम दृश्य समोर आले आहेत.

सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगरातून जाणाऱ्या वळणावळणाच्या रस्त्यांची सर्वच पर्यटकांना नेहमीच भुरळ पडते. कणकवली ते कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा म्हणजेच भूईबावडा घाट.

गगनबावडा येथील दाट धुक्यात कोसळणारा पाऊस, करुळ व भुईबावडा घाटातून वर्षा ऋतुचे सुंदर दृश्य सर्वांनाच आवडते. 

कोकणातील दऱ्यातून वाऱ्याने वर येणारे ढग पावसाची वेगळीच अनुभूती देतात. 

पावसाळ्यात या घाटात फिरायणा येणाऱ्यांची संख्या मोठी असते. पावसात चिंब भिजण्याचा अनेकजण आनंद घेत असतात. 

गगनबावडा, करुळ, भुईबावडा घाटातून वाहणारे झरे, लहान-मोठे धबधबे पर्यटकांना मोहून टाकतात. 

पण, पावसाळ्यात या घाटात दरडी कोसळण्याची मोठी भीती असते. यामुळे इकडे फिरायला जायच्या आधी माहिती घेऊन जावे लागले. 

गगनबावडा घाटातील हिरवाई आणि निसर्गाचे सौदर्य पाहण्यासारखे असते. सोशल मीडियावर या घाटातील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. 

Click Here