देशभक्ती प्रदर्शनाची बाब नाही. ती आपल्या मनात आणि कृतीत कायम असली पाहिजे
भारतीय ध्वज संहिता २००२ आणि राष्ट्रीय सन्मानाचा अपमान प्रतिबंधक कायदा १९७१ मध्ये राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहेत
कायद्यानुसार, सामान्य नागरिकांना आपल्या खासगी वाहनांच्या बोनेटवर किंवा छतावर तिरंगा लावणे हे नियमांचे उल्लंघन ठरू शकते
झेंड्याची स्थिती - तिरंगा नेहमी सन्मानजक स्थितीत असावा. तो फाटलेला, मळलेला आणि चुरगळलेला नसावा. त्याचा रंग फिका पडलेला नसावा
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्यासाठी प्लास्टिकच्या झेंड्याचा वापर करण्यास मनाई आहे. कापडी झेंड्याचाच वापर करा
तिरंगा अशाप्रकारे लावावा की तो कधीही जमिनीला, पाण्याला किंवा रस्त्याला स्पर्श करणार नाही
गाडीवर तिरंगा लावण्यासाठी एक निश्चित जागा आहे. तो गाडीच्या बोनेटवर मध्यभागी किंवा गाडीच्या पुढील उजव्या बाजूला एका दांड्यावर लावावा
तिरंग्याचा वापर कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी, जाहिरातीसाठी किंवा गणवेशाचा भाग म्हणून करता येत नाही