कोलेस्ट्रॉल कमी करायचंय? आहारात करा ज्वारीचा समावेश

ज्वारीची भाकरी खाण्याचे फायदे

निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आहारात भाकरी, थालीपीठ अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश केला पाहिजे. 

आता भाकरी खाण्याचं प्रमाण फार कमी झालं आहे. त्याच्याऐवजी सगळेच पोळी खाण्यावर भर देतात.

भाकरी खाण्याचे अनेक शारीरिक फायदे आहेत. म्हणूनच, दररोजच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश करण्याचे फायदे कोणते ते पाहुयात.

ज्वारीमध्ये तंतुमय पदार्थांचं प्रमाण जास्त असतं ज्यामुळे पोट साफ राहण्यास मदत मिळते. तसंच पोटाचे विकारही कमी होतात.

 रक्तवाहिन्यांतील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी ज्वारी उपयुक्त आहे.

हृदयासंबंधित आजारात ज्वारी अतिशय उपयोगी आहे.

शरीरातील अतिरिक्त चरबी, वजन कमी करायचं असेल तर नियमितपणे ज्वारीची भाकरी खा.

विरळ असलेल्या भुवया अन् पापण्या करा घनदाट!

Click Here