जाणून लगेच खायला सुरुवात कराल...!
मनुक्यात पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, फायबर, जीवनसत्त्वे इत्यादी मुबलक प्रमाणात आढळतात.
मनुक्यांमध्ये व्हिटॅमिन-बी कॉम्प्लेक्स असते, जे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढवण्यास उपयुक्त मानले जाते.
मनुक्यामध्ये असलेले फायबर पोटातील वायू, आम्लता, अपचन आदी समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त मानले जाते.
मनुक्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, जे हाडांचे दुखणे कमी करण्यासाठी आणि त्यांना मजबूत करण्यासाठी फायदेशीर असते.
व्हिटॅमिन-ए, बीटा कॅरोटीन, अँटी-ऑक्सिडंट्स इत्यादी पोषक तत्वे असल्याने, मनुका दृष्टी सुधारण्यास फायदेशीर ठरते.
व्हिटॅमिन-सी गुणधर्मांनी समृद्ध मनुक्याचे रोज सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पोटॅशियमने समृद्ध असलेले मनुके रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही फायदेशीर आहेत.