घरात मांजर पाळण्याचे फायदे आणि तोटे

काही जणांना मांजर पाळायची प्रचंड इच्छा असते. परंतु, घरातले त्यासाठी परवानगी देत नाहीत. 

जगात मांजरप्रेमींची संख्या काही कमी नाही. मांजर आवडत असल्यामुळे अनेक जण मोठ्या हौशीने तिला पाळतात.

काही जणांना मांजर पाळायची प्रचंड इच्छा असते. परंतु, घरातले त्यासाठी परवानगी देत नाहीत. म्हणूनच, मांजर पाळण्याचे फायदे आणि तोटे काय ते पाहुयात.

मांजरीसोबत वेळ घालवल्यामुळे स्ट्रेस लेव्हल कमी होते.  शरीरातील कॉर्टिसोल कमी होऊन आनंद देणारे सेरोटोनिन हे संप्रेरक वाढतं.

ज्या व्यक्ती एकट्या राहतात त्यांच्यासाठी मांजर म्हणजे जवळचा मित्र. अनेकदा या मुक्या प्राण्याची भावनिक साथ माणसाला मिळते.

अभ्यासातून असं दिसून आलंय की, मांजर पाळल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतं. तसंच हृदयरोगाचा धोकाही कमी होतो.

मांजर पाळण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत. काही लोकांना मांजरीच्या केसांची अॅलर्जी असू शकते.

ज्यांना मांजरीच्या केसांची अॅलर्जी असते त्यांना श्वास घेण्यास अडचण येणे किंवा शिंका येत राहणे या समस्या होतात.

मांजरीला लाड करुन घ्यायला आवडतं. त्यामुळे जर तुमचं तिच्याकडे दुर्लक्ष झालं तर तिच्यावर मानसिक ताण येऊ शकतो. यात काही वेळा ती डिप्रेशनमध्ये जाते किंवा आक्रमक होते.

मेथी की बडीशेप पाणी? कोणते पाणी फायदेशीर? 

Click Here