चार्जरशिवाय मोबाईल करा 100% चार्ज, वापरा 'या' स्मार्ट टिप्स

आता फोन चार्ज करण्यासाठी चार्जरची भासणार नाही गरज

आजच्या काळात मोबाईल म्हणजे अत्यावश्यक वस्तूंपैकी एक झाला आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा दिसतोच दिसतो.

अनेकदा घाईघाईमध्ये फोन चार्ज करायचा राहतो. किंवा, कुठे घराबाहेर गेल्यावर फोनची बॅटरी संपते.

ऐनवेळी जर फोनची बॅटरी संपली आणि अशा वेळी काळजी करायची गरज नाही. चार्जशिवाय सुद्धा तुम्ही स्मार्ट टिप्स वापरुन फोन चार्ज करु शकता.

मोबाईल चार्ज करण्यासाठी तुम्ही सोलार चार्जरचा वापर करु शकता. हा चार्जर उन्हात ठेऊन USB केबलच्या मदतीने फोन चार्ज करता येऊ शकतो.

बऱ्याचदा लाइट गेल्यामुळे फोन चार्ज करता येत नाही. यामुळे अनेकांची महत्त्वाची काम रखडली जातात. अशा वेळी ‘हँड-क्रँक चार्जर’ वापरणे हा उत्तम पर्याय आहे. 

‘हँड-क्रँक चार्जर’ मध्ये तुम्हाला फक्त हँडल फिरवावं लागतं. हे चार्जर आपल्या शारीरिक श्रमाचं विजेमध्ये रुपांतर करतं.

सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणीदेखील फोन चार्ज करण्याची सुविधा देण्यात आलेली असते. अशावेळी तुम्ही विमानतळ, रेल्वे स्टेशन, मॉल, बस स्थानकात फोन चार्ज करु शकता.

पेरु खाल्ल्यानंतर 'या' पदार्थांचं करु नका सेवन, ठरेल घातक

Click Here