रोड हिप्नोसिस बद्दल तुम्ही याआधी ऐकलं असेल, नसेल तरी ही माहिती वाचा आणि जास्तीत जास्त शेअर करा; जेणेकरून अनेकांचे जीव वाचतील.
रोड हिप्नोसिस ही एक मानसिक स्थिती आहे, जिथे चालकाचे डोळे उघडे असतात, पण त्याचं लक्ष रस्त्यावर नसतं.
खूप वेळ अथक गाडी चालवण्याने ही स्थिती निर्माण होते. जिथे रस्त्याच्या आजूबाजूला काहीच नसते आणि एकाकी रोड असतो, तिथे हे घडू शकतं.
वाहनचालकावर होणारं हे एकप्रकारे संमोहन असते. रात्रीच्या वेळी हे घडण्याची मोठी शक्यता असते कारण तेव्हा रस्ते मोकळे आणि निर्मनुष्य असतात.
या अवस्थेत मेंदू ‘ऑटो पायलट’ मोडवर जातो. त्याचं पूर्ण भान हरवतं. अपघाताच्या क्षणी चालक भानावर येतो पण वेळ निघून गेलेली असते.
अशा स्थितीत वाहनावरचा ताबा सुटू शकतो, अपघाताची लक्षणं दिसतात पण ब्रेक मारायचा, स्पीड कंट्रोल करायचा याचे भान त्याला राहत नाही.
त्यामुळे वाहन चालकासह सगळ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो. असे घडू नये यासाठी पुढील गोष्टी आवर्जून करा.
दर दोन अडीच तासांनी गाडी थांबवा. बाहेर पडा, शरीर मोकळे करा. एखादा चहा प्या, गरम पाणी प्या, तोंडावर पाण्याचे हबके मारा.
आवडती गाणी लावा. सहप्रवासी बसवा, त्याच्याबरोबर गप्पा मारा. एखादी गोळी तोंडात ठेवा.
अधून मधून स्पीडवर लक्ष द्या, आपला रूट तपासून बघा. थकवा जाणवतोय का याची चाचपणी करा. थोडी जरी ग्लानी येत असेल तर १० मिनिटं विश्रांती घ्या.
प्रत्येक प्रवास महत्वाचा आहे, त्याबरोबरच तुमचा आणि अन्य प्रवाशांचा आणि रस्त्यावरील इतर लोकांचाही जीव महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवा.
वाहतुकीचे नियम पाळा आणि रोड हिप्नोसिसच्या विळख्यातून स्वतःला आणि इतरांना वाचवा.