देवासमोर दिवा लावताना ‘ही’ चूक होते का?

देवासमोर दिवा लावण्याचे काही लाभ सांगण्यात आलेले आहेत.

आपल्या संस्कृतीत दीप प्रज्वलन खूप महत्त्वाचा संस्कार आहे. कोट्यवधी घरात सकाळी सायंकाळी देवासमोर दिवा लावला जातो. 

दिवा हे तेजाचे प्रतिक मानले जाते. दिवा लावल्याने पावित्र्य, चैतन्य आणि सकारात्मकता घरात येते.

अंधार कितीही गडद असला तरी एक पणती दोन हात करण्याची शक्ती देते. दिवा लावणे हे आशेचे लक्षण मानले जाते.

दिवा हा ज्ञानाचे आणि प्रकाशाचेही प्रतिक मानले जाते. दररोजच्या देवपूजनात दिव्याला विशेष महत्त्व आहे.

घरात दीप प्रज्वलन करणे शुभ मानले जाते. घरातील दिवे सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात.

देवासमोर दिवा लावल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिथे स्थिर होते, अशी मान्यता आहे.

शुद्ध तुपाचा दिवा लावणे अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. शुद्ध तुपात वातावरणातील जंतू दूर करण्याची क्षमता असते.

दिवा लावताना दिव्याची वात कोणत्या दिशेला असावी, याचेही काही नियम सांगण्यात आले आहेत. 

तेलाचा दिवा आपल्या डाव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या उजव्या हाताला असायला हवा, असे सांगितले जाते.

धनलाभासाठी दिव्याची वात उत्तर दिशेला, तर घरात वारंवार आजारपण येत असल्यास दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवावी.

दक्षिण यमाची दिशा असल्याने दक्षिण दिशेला कधीही दिव्याची वात नसावी, असे सांगितले जाते.

सदर माहिती सामान्य गृहीतके, मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

Click Here