३०० कोटींची मालक, १० मिलियन फोलोअर्स; कोण आहे ही 'राणी'?

या राणीला जागतिक स्तरावर सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व असल्याचं मानले जाते

एक इस्लामिक राणी, जी नेहमी आधुनिक पोशाखात दिसून येते, अलीकडेच फोर्ब्सने १०० शक्तिशाली महिलांमध्ये त्यांचा समावेश केला आहे

जॉर्डनच्या या राणीचं नाव आहे रानिया अल अब्दुल्ला, त्यांची संपत्ती ३५ मिलियन डॉलर म्हणजेच ३०० कोटी इतकी आहे

रानिया अल अब्दुल्ला या सोशल मीडियावरही बऱ्याच सक्रीय आहेत. त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला १० मिलियनहून अधिक फोलोअर्स आहेत

रानिया यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९७० साली फिलिस्तानी वडील फैसल सेदकी अल असिन यांच्या घरी झाला. आखाती युद्धानंतर त्यांचे कुटुंब जॉर्डनला आले

रानियानं मिस्त्रच्या अमेरिकन विद्यापीठातून बिझनेस एडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे तिथेच त्यांची ओळख राजकुमार अब्दुल्ला यांच्याशी झाली

रानिया, अब्दुल्ला यांचा विवाह १० जून १९९३ साली झाला. तेव्हा रानिया यांचे वय २२ वर्ष होते. ७ फेब्रुवारी १९९९ ला राजा हुसैन यांच्या मृत्यूनंतर प्रिंस अब्दुल्ला राजा बनले

Click Here