एका शतकी खेळीसह KL राहुलनं दोन खास विक्रमांना घातली गवसणी
दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुलनं आयपीएलमधील पाचवे शतक झळकावले. या शतकासह खास विक्रम त्याने आपल्या नावे केला.
तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीकडून शतक झळकवणारा तो एकमेव फलंदाज आहे. एवढेच नाही तर पाचही वेळा शतकी खेळीसह तो नाबादही राहिलाय.
आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत ८ शतके झळकावली आहेत.
किंग कोहलीच्या खात्यातील अर्धी म्हणजे ४ शतके ही त्याना नाबाद राहून झळकावली आहेत.
डेविड वॉर्नर, बटलर आणि एबी डिविलियर्स यांनी प्रत्येकी ३-३ नाबाद शतके झळकावल्याचा रेकॉर्ड आहे.
जोस बटलर हा आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदांजाच्या यादीत ७ शतकांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ख्रिस गेलनं आपल्या आयपीएल कारकिर्दीत ६ शतके झळकावली आहेत.
शुबमन गिलच्या नावे आयपीएलमध्ये ४ शतकांची नोंद आहे.