स्वयंपाक घरातल्या भांड्यांनाही असते एक्स्पायरी  डेट

जाणून घ्या कोणतं भांडं किती काळापर्यंत वापरावं

स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थाला एक्सपायरी डेट असते हे सगळ्यांनाच ठावूक आहे. 

घरात वापरल्या जाणाऱ्या भांड्यांनाही एक्सपायरी डेट असते हे फारसं कोणाला माहित नसेल. त्यामुळेच कोणतं भांडं किती काळापर्यंत वापरावं ते समजून घेऊयात.

आजकाल प्रत्येकाच्या घरात नॉनस्टीक भांडी तर सहज दिसून येतात.परंतु, जर तुमच्या पॅनचं किंवा कढईचं कोटिंग निघालं असेल तर ते टाकून द्या. तसंच साधारणपणे १ ते २ वर्षानंतर ही भांडी चेंज करा.

स्वयंपाक स्त्रियांना घरात लागणारं सगळ्यात मोठं हत्यार म्हणजे सुरी आणि साल काढायचं पिलर. हे दोघेही बराच काळ वापरता येतात. पिलर १ ते २ वर्षात चेंज करावं.

सुरी तुम्ही ५ ते १० वर्ष वापरु शकता.

आजकाल अल्युमिनिअमची भांडी फारसं कोणी वापरत नाही. परंतु, जर तुमच्याकडे ते असतील तर ५ ते ६ वर्षांत नक्कीच ते बदला.

प्रेशर कुकर म्हणजे गृहिणींची हक्काची मैत्रीण. झटपट पदार्थ करण्यासाठी उपयोगी असणारा कुकर ५ ते ८ वर्षांपर्यंत चालू शकतो. परंतु, त्याची शिट्टी आणि वॉल हा ६ महिने ते १ वर्षांनी नक्की बदला.



सिलिकॉन स्पॅटुला( डाव) आणि प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड हे २ ते ४ वर्षांपर्यंतच चांगलं टिकतात. त्यानंतर ते बदलावेत. 

सकाळच्या या सवयी फॉलो करा, यश मिळेल

Click Here