अनेकदा गृहिणींची एकच तक्रार असते ती म्हणजे दिवाळीचा फराळ मऊ पडतो.
अनेकदा गृहिणींची एकच तक्रार असते ती म्हणजे दिवाळीला फराळ केला की तो काही दिवसातच मऊ पडतो.
दिवाळीचा फराळ अगदी तुळशीचं लग्न होईपर्यंत छान कुरकुरीत, खुसखुशीत कसा ठेवायचा ते पाहुयात.
फराळ करण्यापूर्वी त्यासाठी लागणारं सगळं साहित्य व्यवस्थित कोरडं असावं. पोहे, रवा, बेसन आणि खोबरं यांना एकदा ऊन दाखवा.
फराळाच्या पदार्थांना चुकूनही ओला हात किंवा त्यावर पाणी पडू देऊ नका. यामुळे पदार्थाला बुरशी लागते.
फराळ करतांना योग्य तेलाची निवड करा. एकाच तेलात २-३ पदार्थ तळू नका. प्रत्येकासाठी वेगळं तेल वापरा.
फराळ पूर्ण गार झाल्यावरच डब्यात भरा. अनेकदा गरम किंवा कोमट पदार्थ डब्यात तसाच ठेवल्यामुळे तो पदार्थ दमट होतो.
फराळ कायम हवाबंद डब्यातच ठेवा. तसंच काचेच्या किंवा स्टीलच्या डब्यातच फराळ ठेवा. प्लास्टिकच्या डब्यामुळे पदार्थाची मूळ चव बदलते.