मीठ खाण्यायोग्य करण्यासाठी त्याला अनेक रासायनिक प्रक्रियेतून जावं लागतं.
प्रत्येक पदार्थाची चव वाढवण्याचं काम करणारा स्वयंपाक घरातील महत्त्वाचा घटक म्हणजे मीठ.
स्वयंपाक घरातील प्रत्येक पदार्थाला एक एक्सपायरी डेट असते. ठराविक काळानंतर तो पदार्थ खराब होऊ लागतो.
लोणचं, चटणी टिकावी यासाठी कायम त्यात मीठाचा वापर केला जातो. परंतु, पदार्थ टिकवण्यासाठी वापरण्यात येणारं मीठ नेमकं किती काळ टिकतं ते जाणून घेऊयात.
मीठ हे सोडिअम क्लोराइडपासून तयार केलं जातं. त्यामुळे त्याच्यावरा बुरशी किंवा बॅक्टेरिया यांसारखे जीव वाढू शकत नाहीत.
शुद्ध मीठामध्ये पाण्याचा अंश नसतो त्यामुळे त्या मीठाला एक्सपायरी डेट नसते. ते कधीच खराब होत नाही.
अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, समुद्रातून काढलेलं मीठ खराब होत नाही. मात्र, आपण जे घरात मीठ वापरतो ते नक्कीच खराब होऊ शकतं.
मीठ खाण्यायोग्य करण्यासाठी त्याला अनेक रासायनिक प्रक्रियेतून जावं लागतं. यात आयोडिनदेखील टाकलं जातं. त्यामुळे ते ठराविक काळानंतर खराब होऊ शकतं.