भाजीत पाणी जास्त झालं? 'या' ट्रिक्सने करा प्रॉब्लेम सॉल्व्ह
बऱ्याचदा घाईगडबडीमध्ये भाजीत पाणी जास्त होतं आणि सगळी भाजी पांचट होते.
स्वयंपाक करणं ही एक कला आहे. आणि, दररोज हे काम करतांना नवनवीन टास्क समोर येत असतात.
बऱ्याचदा घाईगडबडीमध्ये भाजीत पाणी जास्त होतं आणि सगळी भाजी पांचट होते. म्हणूनच, भाजीतील एक्स्ट्रा पाणी कसं कमी करायचं ते पाहुयात.
भाजीत जर चुकून पाणी जास्त पडलं असेल तर घाबरु नका. गॅसची फ्लेम मोठी करा. मोठ्या गॅसवर भाजी शिजवल्यामुळे त्यातलं पाणी वाफेच्या माध्यमातून निघून जाईल.
भाजीतील एक्स्ट्रा पाणी कमी करायचं असेल तर त्यात उकडलेला बटाटा स्मॅश करुन टाका. यामुळे भाजीला दाटसरपणा येईल.
तुम्ही भाजीत कॉर्नफ्लोवर किंवा बेसन सुद्धा मिक्स करु शकता. यापैकी कोणताही एक पदार्थ घेऊन त्याची पेस्ट करा. ही पेस्ट भाजीत मिक्स करा. यामुळे भाजी घट्ट होईल व चवीमध्येही फरक पडणार नाही.
मध खाण्याचे अफलातून फायदे,शारीरिक तक्रारीही होतील दूर