किचन गार्डन म्हटलं, जागा कुठेय? हा पहिला प्रश्न उपस्थित हाेताे. पण, घरच्या जागेत भाजीपाला लावणे असा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. कमी जागेत, कुंडीत हे सहज शक्य आहे.
दिवसेंदिवस महागाई वाढते आहे, जास्त पैसे माेजूनही उत्तम दर्जाची, भेसळमुक्त भाजी मिळेल याची शाश्वती नाही. यामुळे किचन गार्डनला पसंती मिळते आहे.
काेथिंबीर, मिरच्या, गवती चहा, कढीपत्ता, ओवा, भेंडी, मेथी, गुलाब, माेगरा, जास्वंद अशा प्रकारची राेपं घरात लावू शकताे.
खिडकीमध्ये, बाल्कनीत, टेरेसवर अशा ठिकाणी थाेडी जागा करून कुंडीमध्ये ही राेपं लावता येऊ शकतात.
या राेपांसाठी दिवसातून १० ते १५ मिनिटे जास्तीत जास्त देण्याची गरज असते. आठवड्यातून एकदा वेळ काढून लक्ष दिले तरी चालते.
कुंडीमध्ये बिया पेरताना किंवा राेप लावताना नुसती माती घालू नका. त्याचबराेबर कंपाेस्ट खत घाला, यामुळे मातीचा दर्जा सुधारताे.
घरी राेपं लावल्यामुळे तुम्हाला ताजं, खतांचा भडिमार न करता पिकवलेल्या गाेष्टी खायला मिळतात.
घरातील लहान मुलांचं निर्सगाशी नातं जाेडलं जात. नवनिर्माणाचा आनंद त्यांना घेता येताे, नवीन गाेष्टी शिकायला मिळतात.