नोकरी गेली, आर्थिक परिस्थिती बिघडली... लोकांना आलेत वाईट अनुभव
हाँगकाँगच्या कासिंग लंग यांनी तयार केलेलं "द मॉन्स्टर्स" या सिरीजमधलं विचित्र दिसणारं प्लश टॉय म्हणजे 'लाबूबू डॉल'!
लाबूबू डॉल कमी वेळात खूप प्रसिद्ध झाली. लाबूबूच्या लोकप्रियतेनंतर काही लोकांमध्ये तिच्याबद्दल अंधश्रद्धा, भीती निर्माण झाली आहे.
काहींनी दावा केला की, लाबूबू डॉल्स त्यांच्या जवळ असताना त्यांना अपघात किंवा आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या.
नोकरी गेली, आर्थिक परिस्थिती बिघडली, वाईट काळ सुरू झाला असंही म्हटलं. लाबूबू डॉल नष्ट केल्यावरच त्यांना दिलासा मिळाला.
काही धार्मिक गटांनी लाबूबू डॉल्सला "पाझुजू" या मेसोपोटॅमियन दुष्टात्म्याशी जोडलं आहे.
लाबूबू डॉल ही आपणहून तिची जागा बदलते. एका ठिकाणी ठेवलेली ही बाहुली बरेचदा वेगळ्या ठिकाणी सापडते असं काहींचं म्हणणं आहे.
लाबूबू डॉलला घरी आणणं हे शुभ किंवा अशुभ असल्याचं म्हणणं चुकीचं आहे. कारण हे प्रत्येकाच्या विचारधारेवर आणि आलेल्या अनुभवावर अवलंबून आहे.