जुनी कार खरेदी करताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात!

जर तुम्ही जुनी गाडी खरेदी करत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

जर तुम्ही जुनी गाडी खरेदी करत असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता.

जर तुम्ही जुनी कार खरेदी करत असाल, तर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी, याबद्दल आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देणार आहोत. 

कार खरेदी करताना, नवीन मालकाच्या नावावर नोंदणी प्रमाणपत्र हस्तांतरित करणे अनिवार्य आहे.

जर गाडी कर्जावर असेल तर तुम्हाला एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय मालकी हक्क हस्तांतरित करता येणार नाहीत.

शिवाय जर गाडी कर्जावर असेल, तर फायनान्सर किंवा बँकेकडून देखील एनओसी घेणे गरजेचे आहे. 

जुनी गाडी खरेदी करत असताना इतर कागदपत्रांसोबतच विमा पॉलिसी देखील नवीन मालकाच्या नावावर करून घ्यावी. 

वापरलेली कार खरेदी करण्यापूर्वी त्या गाडीचे इंजिन कधी दुरुस्तीसाठी उघडले गेले होते का, ते तपासून घ्या.

वापरलेली कार खरेदी करताना बॉडी आणि सस्पेन्शन देखील व्यवस्थित तपासून घ्या.

यासोबतच गाडीच्या बाह्य आणि आतील भागाची स्थिती तपसा. बरेच लोक घाईघाईत याकडे दुर्लक्ष करतात. 

Click Here