स्मार्टफोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची सवय आताच बदला, अन्यथा...
स्मार्टफोनला अनेक जण हमखास कव्हर लावतात कारण त्यामुळे फोन सेफ राहतो. चुकून फोन खाली पडला तर डिस्प्ले फुटण्याची शक्यता कमी असते.
फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची खूप जणांना सवय असते. लोक नोटा किंवा कार्ड ठेवतात. पण असं करणं महागात पडू शकतं.
फोन ओव्हरहिट होतो. जर कव्हरमध्ये पैसे ठेवले असतील तर आग लागण्याचा धोकाही वाढतो.
कव्हरमध्ये फोनसोबत कार्ड ठेवल्यास गरम झाल्यावर चिप खराब होते. रेडिओ व्हेव्समुळेही नुकसान होऊ शकतं.
फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवायचे असल्यास असं कव्हर खरेदी करा ज्यामध्ये कार्ड आणि कॅश ठेवण्यासाठी पॉकेट दिलेलं असेल, ज्यामुळे कमी नुकसान होईल.