फ्रीजशिवाय बटर ठेवा महिनाभर फ्रेश, ट्राय करा या टिप्स
बटर योग्यरित्या स्टोर केलं नाही तर त्याला विचित्र प्रकारचा वास येतो.तसंच त्याच्या चवीतही फरक पडतो.
बऱ्याचदा एखादा खास पदार्थ करायचा असेल तर घरात बटर आणलं जातं. मात्र, अनेकदा हे बटर थोडं शिल्लक राहतं.
बटर योग्यरित्या स्टोर केलं नाही तर त्याला विचित्र प्रकारचा वास येतो.तसंच त्याच्या चवीतही फरक पडतो.
साधरणपणे सगळेच जण फ्रीजमध्ये बटर स्टोर करतात. परंतु, जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर महिनाभर फ्रीजशिवाय बटर कसं स्टोर करायचं. याच्या टिप्स पाहुयात.
आजकाल बाजारात बटर ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे कंटेनर, डब्बे उपलब्ध आहेत. या कंटेनरचा वापर तुम्ही करु शकता. यामुळे बटरचा हवेशी थेट संबंध येत नाही. त्यामुळे ते दीर्घकाळ टिकतं.
बटर स्टोर करतांना कायम त्याचे लहान क्यूब्स कट करुन ठेवा. तसंच बटरचे हे तुकडे बटर पेपरमध्येच गुंडाळून ठेवा. ज्यामुळे ते लवकर वितळणार नाहीत.
एका डीशमध्ये गार पाणी घेऊन त्यामध्ये बटरची वाटी वा डब्बा ठेवा. तसंच डीशमधील पाणी रोज बदला. पाण्याच्या थंड तापमानामुळे बटर छान टिकतं.