'या' मुस्लीम देशात आता बुरख्यावर बंदी...!

हिजाबही परिधान करता येणार नाही...!

कझाकिस्तानमधील महिलांना आता सार्वजनिक ठिकाणी नकाब अथवा चेहरा पूर्णपणे झाकणारे कपडे घालता येणार नाहीत. 

येथे नागरिकांच्या सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी सोमवारी या नव्या कायद्यावर स्वाक्षरीही केली.

कझाकिस्तानची ७० टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे आणि इस्लाम समाजात महिलांना हिजाब अथवा निकाब घालण्याची परंपरा आहे. 

महत्वाचे म्हणजे, या कायद्यात धर्माचा अथवा धार्मिक पोशाखाचा उल्लेख नाही. तरीही, या नियमाचा धार्मिक पोशाखांवर परिणाम होऊ शकतो, असे बोलले जात आहे. 

या कायद्यात काही सूटही देण्यात आली आहे. कुणी आजारी असेल, हवामान खराब असेल आणि क्रीडा अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी चेहरा झाकण्याची परवानगी असेल.

यापूर्वी, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि तुर्कमेनिस्तानसारख्या काही इतर देशांनीही नकाब अथवा बुरखा घालण्यास बंदी घातली आहे. 

यासंदर्भात कझाकस्तानचे राष्ट्रपती तोकायेव म्हणाले, लोकांनी चेहरा लपवणाऱ्या कपड्यांऐवजी, आपले पारंपारिक कपडे घालावेत, जे आपली संस्कृती चांगल्या प्रकारे दर्शवतात.

तसेच, देशाची धर्मनिरपेक्षता राखणेही आवश्यक आहे, असेही तोकायेव म्हणाले. यापूर्वी, २०२३ मध्ये, सरकारने शाळांमध्ये हिजाब अथवा नकाब परिधान करण्यावर बंदी घातली होती. 

Click Here