कमाल झाली... मालदीवच्या स्वप्नात आली नटी... 

उठसूट भारतील एक अभिनेत्री सारखी मालदीवला जात होती

उठसूट भारतील एक अभिनेत्री सारखी मालदीवला जात होती, तिलाच आता मालदीवची ब्रँड अॅम्बॅसिडर करण्यात आले आहे. 

एक्स बॉयफ्रेंडसोबत मालदीव, नव्या बॉयफ्रेंसोबत मालदीव, मित्रांसोबत मालदीव आणि लग्नानंतर हनिमूनही मालदीव एवढ्या वेळा कतरिना कैफ मालदीवला गेली होती. 

याच मालदीववर भारतीयांनी भारतविरोधी कारवाया केल्याने बहिष्कार टाकला होता. 

त्याच मालदीवच्या तिकिटांचा खप वाढविण्यासाठी ही नटी काम करणार आहे. 

मालदीवच्या पर्यटनावर बहिष्कार टाकल्याने मालदीव सरकार संकटात सापडले आहे. 

नरेंद्र मोदींविरोधात मालदीवच्या तीन युवा मंत्र्यांनी नकारात्मक टिप्पणी केली होती. तेव्हा संपूर्ण देशवासियांनी 'बॉयकॉट मालदीव'ची मोहीम राबवली होती. 

मालदीवने कतरिना कैफची 'सनी साइड ऑफ लाइफ'साठी ग्लोबल ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. 

मालदीव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दाखवत असले तरी खासकरून भारतीयांना ओढण्याचे कंत्राटच कटरिनाला देण्यात आले आहे. 

सर्वात महत्वाचे म्हणजे मालदीवची ही घोषणा पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याच्या आधी करण्यात आली आहे. 

आता कतरिनाच्या या चेहऱ्याने किती भारतीय भुलतात आणि मालदीवला जातात हे येत्या काळात समजणार आहे. 

Click Here

Your Page!