पत्नीच्या वाढदिवशी विकी कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचा आज वाढदिवस आहे. पत्नीच्या वाढदिवशी विकी कौशलने खास पोस्ट शेअर केली आहे.
विकीने कतरिनाचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"हॅपी बर्थडे गर्ल, आय लव्ह यू" असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.
कतरिना आज तिचा ४२वा वाढदिवस साजरा करत आहे.
कतरिना ही एक ब्रिटीश अभिनेत्री आहे. तिने सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केलं आहे.
कतरिना आणि विकीने २०२१ मध्ये लग्न करत संसार थाटला. त्यांच्या लग्नाला ४ वर्ष होत आहेत.