रानभाज्यात सर्वात आरोग्यवर्धक व महागडी रानभाजी म्हणून ओळख
करटोली ही भोपळ्याच्या कुळातील फळवर्गीय वनस्पती आहे. ह्या भाजीची आता व्यवसायिक शेतीसुद्धा केली जातेय.
करटोलीला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे येण्यास सुरवात होते.
मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते.
या फळांची भाजी तेल आणि कांद्यावर परतून किंवा चण्याच्या डाळीमध्ये केली जाते तसेच तुम्ही तुमच्या पद्धतीनुसारही ह्याची भाजी बनवू शकता.
मागील वर्षीच्या तुलनेत या भाजीच्या दरात वाढ झाली आहे. यावर्षी करटोलीला २४० रुपये प्रति किलो असा दर मिळतोय.