भावाच्या लग्नात कार्तिकी गायकवाडची हवा!

कार्तिकी गायकवाडचा भाऊ कौस्तुभ लग्नाच्या बेडीत अडकला आहे. कौस्तुभने काव्यासोबत सप्तपदी घेतले. 

'सारेगमप लिटिल चॅम्प्स' फेम कार्तिकी गायकवाडचा भाऊ कौस्तुभ लग्नाच्या बेडीत अडकला आहे. कौस्तुभने काव्यासोबत सप्तपदी घेतले. 

कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत कौस्तुभ आणि काव्याचा विवाहसोहळा पार पडला. कार्तिकीने त्यांच्या साता जन्माची गाठ बांधली. 

भावाच्या लग्नात कार्तिकीने खास लूक केला होता. तिने पांढऱ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसली होती.

त्यावर हिरव्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज तिने घातला होता. 

कपाळावर चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या आणि भरजरी दागिने घालत कार्तिकी नटली होती. 

भावाच्या लग्नात कार्तिकीचीच हवा पाहायला मिळाली. मराठमोळ्या लूकने तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

भावाच्या लग्नाचे फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

Click Here