'कडू कारलं तुपात तळलं, साखरेत घोळलं तरी कडू ते कडूच', अशी म्हण आपल्याकडे आहे. परंतु, हेच कारलं शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे.
कारलं खाल्ल्यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहतं हे सगळ्यांनाच ठावूक आहे. परंतु, कारल्याचे अन्यही काही गुणधर्म आहेत ते पाहुयात.
शरीरातील एक्स्ट्रा फॅट्स कमी करण्यासाठी कारल्याच्या रसाचं सेवन करावं. परंतु, हा रस अगदी ४-५ चमचेच प्यावा. कारल्याचा रस कधीही ग्लासभर पिऊ नये. त्यामुळे शरीरातील पित्त वाढू शकतं.
एखादा किडा चावल्यानंतर अंगाची आग होत असेल तर त्याजागी कारल्याच्या पानांचा रस लावावा.
तोंडाला चव नसेल किंवा भूक लागत नसेल तर कारल्याची भाजी नियमित खावी.
कारले उत्तम रक्तशुद्धी करते त्यामुळे त्वचारोग असणा-या लोकांनी आहारात आवर्जुन कारल्याचा समावेश करावा.
मासिक पाळी वेळेवर येत नसेल किंवा अचानक बंद झाली असेल तर नियमित कारल्याची भाजी खावी.
रातआंधळे पण असेल तर डोळ्यावर कारल्याच्या पानांचा लेप लावतात.