कपिल शर्माचा नवा लूक पाहिलात का? तासंतास जिम, कडक डाएटशिवाय ११ किलाे वजन कमी केले आहे. किती दिवसात हे घडलं माहिती आहे का?
काॅमेडियन आणि अचूक टायमिंगमुळे नेहमीच चर्चेत असणारा कपिल शर्मा आता त्याच्या वजनामुळे चर्चेत आला आहे.
इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांप्रमाणे कपिल शर्माची लाईफस्टाईलही व्यग्र हाेती. त्यामुळे जेवणाच्या, झाेपण्याच्या वेळा ठरलेल्या नसत.
२०१७ मध्ये कपिलला ब्लड प्रेशरचा त्रास झाला हाेता. शुटिंग सुरू असताना ताे चक्कर येऊन पडला हाेता.
कपिलला अतिरिक्त वजन कमी करायचे हाेते. पण, त्यासाठी त्याने तासंतास जिममध्ये घाम गाळला नाही किंवा फुल डायटिंग केले नाही.
कपिल शर्माने फक्त ६३ दिवसांत तब्बल ११ किलाे वजन कमी केले. त्यामुळे त्याचा पूर्ण लूक चेंज झाला आहे.
कडक शिस्त, लाईफस्टाईल, बेसिक व्यायामापासून सुरूवात करून त्याने हे शक्य केले आहे.
शरीराला व्यायामाची सवय नसल्याने पहिल्या दिवशी स्ट्रेचिंग करतानाही कपिलला त्रास झाला हाेता.
शरीराला खाण्यापिण्याची शिस्त कपिलने लावली. आहारात मासे आणि भाज्यांचा माेठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला.
कपिलने वजन कमी करण्यासाठी जेवण्याची आणि झाेपेची वेळ फिक्स केली. ही वेळ त्याने फाॅलाे करण्यासाठी लाईफ स्टाईल बदल केले.