जुलैमध्ये सूर्य आणि शनी यासोबतच आणखीही अनेक ग्रह स्थलांतरित होणार आहेत, ज्याचा शुभ परिणाम मुख्यत्त्वे तीन राशींना होणार आहे.
ग्रहांच्या स्थलांतराचा जीवन सृष्टीवर शुभ अशुभ परिणाम होत असतो. जुलैमधील ग्रहस्थिती देखील संमिश्र परिणामकारक असेल.
जुलै मध्ये सूर्य, शुक्र, मंगल, गुरु, शनी, रवी सगळे ग्रह आपापले स्थान सोडून मार्गक्रमणा करणार आहेत, त्याचा लाभ कोणाला होणार ते पाहू.
९ जुलै रोजी गुरुचा मिथुन राशीत उदय होईल, १३ जुलै रोजी शनी मिन राशीत वक्री होईल, १६ जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करतील.
१८ जुलै रोजी बुध कर्क राशीत वक्री होणार असून २४ जुलै रोजी कर्क राशीत मार्गस्थ होईल. २६ जुलैला शुक्र मिथुन राशीत आणि २८ला मंगळ कन्या राशीत जाईल.
ही ग्रहस्थिती तीन राशींची गृहस्थिती, मनःस्थिती, आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्थिती बदलणारी ठरेल.
मेष : जुलै महिना तुमच्यासाठी कमाईचा ठरेल, समाजात मान सन्मान वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक स्थिती भक्कम होईल.
कन्या : जुलैमध्ये पदोन्नती आणि पगारवाढ होण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती उत्तम होईल. नोकरी व्यवसायात नफा मिळेल.
वृश्चिक : कुटुंबसौख्य लाभेल. व्यवसायात बक्कळ पैसा मिळेल. इच्छा पूर्ण होतील आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.