बुमराहच्या एका षटकात सर्वाधिक धावा कुटणारे IPL मधील ५ स्टार फलंदाज

बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं सर्वात कठीण मानले जाते, पण...

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर २ च्या लढतीत जसप्रीत बुमराह चांगलाच महागडा ठरला. 

या सामन्यात ऑस्ट्रेलियन जॉस इंग्लिसनं त्याच्या एकाच षटकात २ चौकार आणि २ षटकार मारून बुमराहचे खांदे पाडल्याचे पाहायला मिळाले. 

इथं एक नजर टाकुयात आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर कडक बॅटिंग करणाऱ्या फलंदाजांवर...

आयपीएलमध्ये बुमराहच्या एका षटकात सर्वाधिक धावा कुटण्याचा रेकॉर्ड हा पॅट कमिन्सच्या नावे आहे. २०२० च्या हंगामात त्याने ६ चेंडूत २६ धावा काढल्या होत्या. 

ड्वेन ब्रावोनं २०१८ च्या हंगामात बुमराहच्या एका षटकात २० धावा कुटल्या होत्या.

त्यानंतर या यादीत जॉस इंग्लिसचा नंबर लागतो.  जॉस इंग्लिसनं पंजाबच्या ताफ्याकडून खेळताना बुमराहच्या एका षटकात २० धावांची कडक खेळी केली.

२०२५ च्या हंगामात करूण नायर याने बुमराहच्या एका षटकात १८ धावा कुटल्या होत्या. 

 फाफ ड्युप्लेसिसही या यादीत आहे. २०२१ च्या हंगामात चेन्नईच्या संघाकडून खेळताना त्याने बुमराहच्या षटकात १७ धावा काढल्या होत्याय 

Click Here

राजस्थानच्या ताफ्यातील जोफ्रा आर्चरनं २०२५ च्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध एकही विकेट न घेता ४ षटकात ७६ धावा खर्च केल्या.