...अन् जोस बटलरनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड

फक्त या चौघांनीच गाठलाय हा पल्ला

स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात १५० वा टी-२० सामना खेळताना जोस बटलरनं मोठा डाव साधला आहे. 

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीने (चेंडूनुसार) ४००० धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड त्याने आपल्या नावे केला.

बटरलनं २६७० चेंडूत ४००० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह त्याने हिटमॅन रोहित शर्माला मागे टाकले.

 रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने २८६० चेंडूत हा पल्ला गाठला होता.

विराट कोहलीनं आपल्या टी-२० कारकिर्दीत ४००० धावांचा पल्ला गाठताना २९०० चेंडूचा सामना केला आहे. 

छोट्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात आघाडीवर असलेल्या बाबर आझमनं ३०८१ चेंडूत ४००० धावा केल्या आहेत. 

रोहित, विराट आणि बाबर आझम यांच्यानंतर T20I मध्ये ४००० धावा करणारा तो चौथा बॅटर ठरला. 

विकेट किपर बॅटरच्या रुपात हा मैलाचा पल्ला गाठणारा बटलर पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

Click Here