बदलत्या लाइफस्टाइल, चुकीचा आहार, अपूर्ण झोप यामुळे अनेकदा मासिक पाळीचं चक्र बिघडतं.
महिलांचं आरोग्य निरोगी आहे हे सांगणारा महत्त्वाचा संकेत म्हणजे नियमितपणे येणारी मासिक पाळी.
सध्या अनेक तरुणी,महिला अनियमित मासिक पाळीच्या त्रासाने त्रस्त आहेत. म्हणूनच, मासिक पाळी नियमित येण्यासाठीचा एक सोपा उपाय पाहुयात.
मासिक पाळी उशीरा येत असल्यास जिऱ्याचं पाणी प्यावं.
एक कप पाण्यात अर्धा चमचा जिरं घालून ते पाणी चांगलं उकळवा.
हे पाणी उकळून अर्धा कप झाल्यावर कोमट असतांनाच रिकाम्यापोटी घ्या.
हा उपाय मासिक पाळीच्या ३-४ दिवस आधी दररोज करावा.