बुमराह ते रैना! Playoffs मध्ये सर्वाधिक वेळा सामनावीर ठरलेले खेळाडू

यंदाच्या हंगामात बुमराहला टॉपर होण्याचा डाव साधणार का? 

मिस्टर IPL स्पेशलिस्ट सुरेश रैनानं आयपीएलमधील प्लेऑप्समध्ये ३ वेळा त्याने मॅच विनिंग कामगिरीसह सामनावीर  पुरस्कार मिळवल्याचा रेकॉर्ड आहे.

मुंबई इंडियन्सकडून मैदान गाजवणाऱ्या कायरन पोलार्डनंही प्लेऑफ्समध्ये ३ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकल्याचा रेकॉर्ड आहे.

CSK, RCB, पुणे अन् दिल्लीच्या ताफ्यातून खेळताना दिसलेल्या फाफ ड्युप्लेसिस प्लेऑफ्समध्ये ३ वेळा सामनावीर पुरस्कार पटकवलाय. 

मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत प्लेऑफ्सच्या लढतीत दोन वेळा सामनावीर पुरस्कारावर नाव कोरले आहे.

मैदानाच्या कानाकोपऱ्यात फटकेबाजी करत IPL गाजवणाऱ्या एबी डिव्हिलियर्सनं प्लेऑफ्समध्ये दोन वेळा सामनावीर पुरस्कार मिळवल्याचा रेकॉर्ड आहे.

चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळणाऱ्या ऋतुराज गायकवाड याने दोन वेळा प्लेऑफ्ममध्ये सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.

भारताचा अनुभवी फलंदाज मनीष पांडेचाही या यादीत समावेश होतो. त्याने प्लेऑफ्समध्ये दोन वेळा सामनावीर पुरस्कार पटकवला आहे.

Click Here

Your Page!