WTC Final : जसप्रीत बुमराहच्या रेकॉर्डवर असतील या तिघांच्या नजरा

WTC च्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये बुमराह टॉपला, पण...

WTC च्या यंदाच्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह सर्वात अव्वलस्थानी आहे.

बुमराहनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या चक्रात १५ कसोटीतील २८ डावात ७७ विकेट्स घेतल्या आहेत.

या यादीत ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या स्थानी आहे. त्याने १७ सामन्यातील ३३ डावात ७३ विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. 

मिचेल स्टार्कनं १८ सामन्यातील ३५ डावात ६९ विकेट्स मिळवत तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलियन फिरकीपटू नॅथन लायन याने १६ सामन्यातील २८ डावात आपल्या खात्यात  ६९ विकेट्स जमा केल्या आहेत. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा आर, अश्विन १४ सामन्यातील २१ विकेट्ससह या यादीत पाचव्या स्थानावर आहे.

सलग दोन वेळा WTC फायनल खेळणाऱ्या टीम इंडियाला मागे टाकत  ऑस्ट्रेलिया संघाने सलग दुसऱ्यांदा फायनल गाठलीये. 

ऑस्ट्रेलियन संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध WTC फायनल खेळणार असून या सामन्यात पॅट कमिन्स, स्टार्क आणि लायन या तिघांकडे बुमराहला मागे टाकण्याची संधी असेल.

Click Here