बुमराहचा विक्रमी 'पंजा'; जाणून घ्या खास रेकॉर्ड

परदेशात सर्वाधिक ५ विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

इंग्लंड विरुद्धच्या हेडिंग्लेच्या मैदानातील पहिल्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहनं पहिल्या डावात पाच विकेट्स घेत कपिल पाजींच्या विक्रमाशी बरोबरी केली. 

परदेशातील मैदानात सर्वाधिक वेळा ५ विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह कपिल पाजींसह संयुक्तरित्या अव्वलस्थानावर आहे.

जसप्रीत बुमराहनं आतापर्यंत १२ वेळा परदेशी मैदानात ५ विकेट्सचा डाव साधला आहे.

कपिल देव यांच्या नावेही बुमराह प्रमाणे १२ वेळा पाच विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

अनिल कुंबळे या दिग्गज फिरकीपटूनं १० वेळा परदेशी मैदानात ५ विकेट्स घेतल्या आहेत.

इशान शर्मा याने भारताबाहेर खेळलेल्या कसोटी सामन्यात ९ वेळा पाच विकेट्स घेण्याची कामगिरी करुन दाखवली आहे.

झहीर खान आणि आर. अश्विन यांनी परदेशी मैदानात कसोटी खेळताना प्रत्येकी ८-८ वेळा पाच विकेट्सचा डाव साधलाय. 

Click Here