सध्या जपानी वॉक हा फिटनेसचा नवा ट्रेंड चर्चेत येत आहे.
सध्याच्या काळात प्रत्येक जण फिटनेस फ्रीक झाला आहे.
अनेक जण फिट राहण्यासाठी जीममध्ये घाम गाळतात. तर, काही जण डाएटचा आधार घेतात.
सध्या जपानी वॉक हा फिटनेसचा नवा ट्रेंड चर्चेत येत आहे. त्यामुळेच जपानी वॉक म्हणजे नेमकं काय ते पाहुयात.
जपानी वॉकमध्ये ३ मिनिटे जलद गतीने आणि ३ मिनिटे धिम्या गतीने चालायचं असतं.
साधारणपणे अर्ध्या तासात ५ वेळा या पद्धतीने चालायचं. सोबतच शरीर स्ट्रेट ठेऊन दीर्घ श्वास घ्यायचा असतो.
या वॉकमुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत मिळते. तसंच शरीरातील ऑक्सिजनची पातळीदेखील वाढते.