डब्यात ठेवलेल्या गुळाला पाणी सुटतंय? फॉलो करा टिप्स
गुळ खराब होऊ नये यासाठी टिप्स
वातावरण बदललं की त्याचा परिणाम जसा आपल्या आरोग्यावर होत असतो. तसाच परिणाम पदार्थांवरही होत असतो.
हिवाळ्यात अनेकदा गूळ चिकट होतो किंवा त्याला पाणी सुटतं. इतकंच नाही तर काही वेळा हा गूळ काळाही पडतो.
गूळ खराब होऊ नये किंवा त्याला पाणी सुटू नये यासाठी तो कायम मातीच्या किंवा काचेच्या बरणीत ठेवावा.
बाजारातून आणलेला गूळ कधीही लगेच डब्यात भरु नये. त्यापूर्वी तो एका कापडावर पसरवून ठेवावा. हवेशीर जागेत गूळ ठेवल्यामुळे तो कोरडा होतो व त्यातील आर्द्रता कमी होते.
गूळ चुकूनही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नका. प्लास्टिकमध्ये गूळ ठेवल्यास त्याला पाणी सुटतं.
गुळाच्या डब्यात तांदळाची पुरचुंडी ठेवा. यामुळे डब्यातील ओलावा हे तांदूळ शोषून घेतात.
गुळ ठेवलेल्या डब्यात तुम्ही दालचिनीचे तुकडेदेखील टाकू शकता. यामुळे गुळाला मुंग्यादेखील लागत नाहीत.
फक्त ५ मिनिटांत काढा पांढऱ्याशुभ्र जीन्सवरील हट्टी डाग...