कोण आहे ही बॉलिवूडची 'आयलंड क्वीन'
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने आणि मनमोहक स्टाइलने लाखो लोकांना वेड लावले आहे.
अशीच एक अभिनेत्री आहे, जिचा सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश आहे.
विशेष म्हणजे ती थेट एका खाजगी बेटाची मालकीण आहे. ती अभिनेत्री आहे जॅकलिन फर्नांडिस.
जॅकलिन फर्नांडिस ही एकमेव बॉलिवूड स्टार आहे, जिने स्वतःचे खाजगी बेट विकत घेतले आहे.
श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील चार एकरांचे हे बेट २०१२ साली तिने खरेदी केले होते.
हे बेट श्रीलंकेच्या एका उच्चभ्रू क्षेत्रात असून माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराच्या बेटाजवळच आहे.
यासाठी तिने सुमारे ६००,००० अमेरिकन डॉलर्स (३ कोटी रुपये) मोजले होते.
जॅकलिन ही चित्रपट, जाहिरातींमधून करोडोंची माया कमावते. लक्झरी गाड्या, प्रायव्हेट जेट्स आणि आलिशान बंगले असं लक्झरी आयुष्य ती जगते.