पावसाळा आपल्याला अधिक आवडतो पण या ऋतूमध्ये काळजी न घेतल्यास त्वचेला खाज सुटू शकते.
पावसाळ्यात वातावरणात गारवा असतो परंतु, आपल्या काही चुकांमुळे त्वचेचे संसर्ग वाढू शकतात.
या ऋतूमध्ये ओले कपडे घालू नका. यामुळे बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढते. ओलाव्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन वाढते.
वातावरणात आर्द्रता असल्यामुळे या वेळी सिंथेटिक कपडे घालू नका. यामुळे त्वचेवर पुरळ आणि खाज सुटू शकते.
आपण पावसाळ्यात ओले बूट किंवा सॉस घातल्याने बुरशीजन्य संसर्ग वाढतात. यामुळे पायांच्या त्वचेला ऍलर्जी होऊ शकते.
पावसाळ्यात बाहेर अनवाणी फिरु नका. तसेच घरात येण्यापूर्वी हात-पाय स्वच्छ धुवा. ओलाव्यामुळे त्वचेचे इन्फेक्शन वाढते.
पावसाळ्यात स्वच्छ आणि कोरडे कपडे घाला. घाम आल्यावर कपडे बदला. बॅक्टेरियामुळे ऍलर्जी वाढू शकते.
पावसाळ्यात बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. जास्त द्रवपदार्थ प्या, गरम आणि ताजे अन्न खा.