वजन कमी करायचं असेल तर...
घरामध्ये कोणत्याही भाजीसोबत चपाती हमखास खाल्ली जाते. चपाती किंवा भाकरी ही रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.
चपातीमध्ये अनेक पोषक घटक असतात, मात्र काही लोकांना चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढतं असं वाटतं.
बहुतेक घरांमध्ये गव्हाच्या पिठापासून चपात्या बनवल्या जातात. गव्हामध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, चपाती खाल्ल्याने वजन वाढत नाही. मात्र त्या जास्त न खाता योग्य प्रमाणात खायला हव्यात.
जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त चपाती किंवा भाकरी खात असाल तर ते तुमच्या आरोग्याला नक्कीच हानी पोहोचवू शकतं.
वजन कमी करायचं असेल तर चपाती किंवा भाकरीचा आकार नेहमी लहान असावा.
आहारात प्रामुख्याने चपाती, ज्वारी, बाजारी आणि नाचणीच्या भाकरीचा समावेश करा, हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.