वैदिक ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचा एका विशिष्ट प्राण्याशी किंवा पक्ष्याशी संबंध असतो. त्यांना खाऊ घातल्याने काय लाभ होतो ते जाणून घ्या.
अन्नदान केल्याने ग्रहदोष दूर होतो आणि आयुष्यातील अडथळे दूर होण्यास मदत होते.
चला तर कोणता ग्रह कोणत्या प्राणी/पक्ष्यामुळे पॉवरफुल होऊ शकेल, ते जाणून घेऊ.
सूर्य - गायींना गहू किंवा गूळ खायला दिल्याने करिअरची वाढ आणि प्रतिष्ठा वाढते.
चंद्र - माशांना पिठाचे गोळे किंवा तांदूळ खायला दिल्याने भावनिक अस्थिरता आणि ताण कमी होतो.
मंगळ - कुत्र्यांना अन्न दिल्याने कायदेशीर आणि मालमत्तेशी संबंधित त्रास दूर होतात.
बुध - गायींना हिरव्या भाज्या खायला दिल्याने संवाद कौशल्य आणि बुद्धिमत्ता सुधारते.
गुरु - माकडांना केळी खायला दिल्याने ज्ञान, बुद्धी आणि समृद्धी वाढते.
शुक्र- पांढऱ्या कबुतरांना किंवा चिमण्यांना खायला दिल्याने प्रेम, सुसंवाद आणि आर्थिक लाभ होतो.
शनि - कावळ्यांना किंवा काळ्या कुत्र्यांना खायला दिल्याने शनि दोष आणि करिअरमधील संघर्ष कमी होतात.
राहु - मुंग्या आणि भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने नकारात्मक ऊर्जा आणि लपलेल्या शत्रूंपासून संरक्षण होते.
केतू - रस्त्यावरील कुत्र्यांना आणि भटक्या प्राण्यांना खायला दिल्याने आध्यात्मिक वाढ होते आणि भीती दूर होते.
सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.