एका फोटोमध्ये सईकडे ही प्रसिद्ध असलेली Labubu डॉल दिसली. सध्या जगभरात या डॉलची चर्चा आहे.
सई ताम्हणकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवलं.
नुकतंच सईचा वाढदिवस झाला. याचे फोटो तिने शेअर केले होते.
त्यातील एका फोटोमध्ये सईकडे ही प्रसिद्ध असलेली Labubu डॉल दिसली. सध्या जगभरात या डॉलची चर्चा आहे.
हाँगकाँगच्या कासिंग लंग यांनी तयार केलेल्या द मॉन्स्टर्स या सीरिजमधील विचित्र दिसणारी ही लाबुबु डॉल आहे.
ही डॉल बाजारात येताच अनेकांनी त्या घेण्यासाठी रांगा लावल्या होत्या. पण नंतर मात्र अनेकांना विचित्र अनुभव आले.
लाबुबु डॉलमुळे अपघात झाले, असं काहींचं म्हणणं आहे. तर काही जण ही डॉल स्वत:च जागा बदलत असल्याचं म्हणतात.
त्यामुळे सईकडे असलेल्या या लाबुबु डॉलला शापित म्हटलं जात आहे.