रम, व्हिस्की आणि बिअर सारखे अल्कोहोल व्हेज आहेत की नॉन-व्हेज, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.
धान्य, फळे किंवा ऊस यापासून अल्कोहोल बनवले जाते. बियर बार्लीपासून, रम उसापासून आणि व्हिस्की गहू किंवा बार्लीपासून बनवली जाते. हे घटक शाकाहारी आहेत.
काही मद्यांमध्ये माशांमध्ये मिळणारे इसिंग्लास, जेलाटिनचा वापर फिल्टरींगसाठी केला जातो, हे दारुला मांसाहारी बनतात.
बियर बहुतेकदा बार्ली, हॉप्स आणि पाण्यापासून बनवली जाते. पण काही ब्रँड आयसिंग्लासने फिल्टर करतात, ते मांसाहारी आहे. आता बरेच ब्रँड व्हेज फिल्टर वापरतात.
रम ही ऊस आणि गुळापासून बनवली जाते ती शाकाहारी असते. काही रममध्ये मध किंवा दुग्धजन्य पदार्थ असू शकतात.
व्हिस्की धान्यांपासून (गहू, बार्ली) बनवली जाते. ती सहसा व्हेगन असते. परंतु काही लिकर-आधारित व्हिस्कीमध्ये मध किंवा जेटालिन असू शकते.
लेबलवर 'व्हेगन' किंवा 'नो अॅनिमल प्रोडक्ट्स' असे लिहिले आहे का ते पहा. बार्निव्होर सारख्या काही अॅप्स किंवा वेबसाइट्स वापरून वाइनची व्हेगन स्थिती तपासा.
भारतात, ओल्ड मॉंक, मॅकडॉवेल सारख्या रम आणि अनेक व्हिस्की शाकाहारी असतात. परंतु आयात केलेल्या दारूमध्ये मांसाहारी घटक असू शकतात, म्हणून तपासणी करणे आवश्यक आहे.
रम, व्हिस्की आणि बिअर बहुतेक व्हेज असतात, पण फिल्टरिंग प्रक्रियेत मांसाहारी घटक असू शकतात. म्हणून हुशारीने निवडा.