अनेक जण रात्री पोटभर जेवत नाहीत.ज्यामुळे त्यांनी मध्यरात्री बरोबर भूक लागते.
भूक लागली की आपण सगळ स्वयंपाक घरात जातो आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं जे काही जंक फूड असेल ते खातो. परंतु, मध्यरात्री असं खाणं धोक्याचं आहे.
रात्री जंकफूड किंवा अन्य काही खाल्ल्यामुळे अन्नाचं नीट पचन होत नाही. ज्यामुळे कॅलरीज बर्न होण्याची प्रक्रिया सुरळीतपणे काम करत नाही. पर्यायाने, वजन वाढतं.
रात्री-अपरात्री खाल्ल्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो. ज्यामुळे गॅस, अपचन यांसारख्या समस्या निर्माण होतात.
रात्री वारंवार उठल्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते. आणि, कालांतराने झोपेशी निगडीत समस्या निर्माण होतात.
रात्री खाल्ल्यामुळे ब्लडशुगर असंतुलित होतं. ज्यामुळे रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.
रात्री तेलकट किंवा मसालेदार पदार्थ खाल्ल्यामुळे हृदय आणि किडनीवर त्याचा परिणाम होतो.
'या' तीन टीप्स फॉलो केल्या तर मुलं स्वत:हून करतील Home work