सकाळी ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिणे योग्य की अयोग्य ? 

अनेकांना सकाळी उठल्याबरोबर ब्रश केल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते.

पण खरंच ही सवय आपल्या ओरल हेल्थ आणि दातांच्या आरोग्यासाठी योग्य आहे का?

ब्रश केल्यानंतर लगेच चहा घेतल्याने आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतात हे जाणून घेऊया.

ब्रश केल्यावर तोंडाचा pH थोडा अल्कलाईन होतो. चहा - कॉफीमध्ये ॲसिडिक घटक असतात, ज्याचा दातांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

टूथपेस्टमध्ये असलेले फ्लोराइड दातांना मजबूत करते. पण ब्रश केल्यानंतर लगेच चहा प्यायला, तर दातांवरील फ्लोराइडचा थर नाहीसा होऊन ते कमकुवत होतात. 

ब्रश केल्यानंतर लगेच चहा प्यायल्यास दातांवरील एनामेलचा संरक्षक थर खराब होतो. यामुळे चहातील टॅनिन दातांना चिकटून बसते, ज्यामुळे दात पिवळे होऊ शकतात.

ब्रश केल्यानंतर तोंडात टूथपेस्टची चव राहते, अशावेळी चहा प्यायल्यास चहाची चव लागत नाही सोबतच तोंडाची चव देखील बिघडते. 

सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी पिणे अधिक फायदेशीर ठरते. त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया सुधारते.

ब्रश केल्यानंतर लगेच चहा पिणे टाळणे आरोग्यासाठी चांगले आहे. त्यामुळे, सकाळी आधी कोमट पाणी प्या आणि नंतरच चहा घ्या.

Click Here