हाच दावा योग्य आहे की अयोग्य हे जाणकारांकडून जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियावर स्वयंमघोषित हेल्थ एक्सपर्ट्सचा सुळसुळाट झाला आहे.
सोशल मीडियावर काय हेल्दी आहे आणि काय नाही याची माहिती देणारे रील्स नेहमी व्हायरल होत असतात.
आता अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या पोस्टमध्ये ब्रेड हा फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो टोस्ट करून खाणे हे आरोग्यासाठी चांगलं असतं असा दावा करण्यात आला आहे.
आज आपण हाच दावा योग्य आहे की अयोग्य हे जाणकारांकडून जाणून घेणार आहोत.
सोशल मीडियातील दाव्यानुसार ब्रेड फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो टोस्ट केल्यास त्यातील स्टार्चचं Resistant starch मध्ये रूपांतर होतं.
Resistant starch हा गुड गट बॅक्टेरियासाठी पोषक असतो. यामुळं ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणात राहतं.
ग्लुकोजचं प्रमाण नियंत्रणात राहिल्यानं पोटफुगी होत नाही. हे पोटासाठी आरामदायी असतं.
सोशल मीडियावरील या पोस्टबाबत आहारतज्ज्ञांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी या दाव्यात तथ्य असल्याचं सांगितलंय.
ब्रेड फ्रीजमध्ये ठेवून नंतर तो टोस्ट करून खाणे हे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगलं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.