लोखंडाच्या भांड्यात नेमके कोणते पदार्थ करावेत?

लोखंडाची भांडी स्वयंपाकासाठी वापरावी का? 

स्वयंपाक घर म्हटलं की तिथे अनेक प्रकारची,आकाराची भांडी पाहायला मिळतात. 

पूर्वीच्या काळी लोखंड, तांबे, पितळ यांचीच भांडी खासकरुन वापरली जायची. परंतु, ती वापरायची एक पद्धत होती.

आजही लोखंडी भांडी सहज उपलब्ध होतात. परंतु, ती कशी वापरायची याचं कोणालं फारसं ज्ञान नाही. 

लोखंडी भांड्यांमध्ये कोणते पदार्थ करावेत हे आज समजून घेऊयात.

भाजी, आमटी किंवा फोडणी देण्यासाठी लोखंडी कढईचा वापर करता येतो.

पुरी, भजी यांसारख्या तळणीचे पदार्थदेखील लोखंडी कढईत करता येतात.

आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असल्यास अन्नपदार्थ शिजवल्यानंतर त्यामध्ये लोखंडी पळी घालून ठेवावी. त्यामुळे पदार्थात पळीतील लोह उतरते आणि शरीराला लोह मिळण्यास मदत होते. 

पोळी किंवा भाकरीसाठी नॉन स्टीक तव्यावर करण्यापेक्षा लोखंडी तव्यावर करावेत.

लोखंडी कढईमध्ये दही किंवा दह्याचे पदार्थ चुकूनही करु नये. तसंच लिंबाचा वापरही लोखंडी कढईत करु नये.

कानात हेडफोन्स लावून झोपता..त्याचे दुष्परिणाम ऐका

Click Here